हिंदू-मुस्लिम बांधवांची उपस्थिती
बीड दि. 19 (प्रतिनिधी): जगतगुरू हजरत मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी शहरात परंपरेनुसार जुलूस-ए- मोहम्मदी काढण्यात आला. सिरत कमेटी व केजीएन ग्रुप ने पोलिस व प्रशासनाच्या निर्देशानुसार कोविड-19 चे नियमाचे पालन करत जुलूस व इतर धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडले.

इस्लामिक तिथी 12 रब्बील अव्वल हा दिवस ईद-ए-मिलाद म्हणुन जगभरात साजरा केला जातो. कोरोना संक्रमण व लॉकडाउनमुळे मागील दो वर्ष सरकार व प्रशासनाच्या गाईडलाइन चे पालन करीत आयोजन समिती ने जुलूस रद्द करून प्रशासनास सहकार्य केले होते. यंदा राज्य सरकार ने नियम शिथिल करीत नियम व अटीनुसार धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनास परवानगी दिल्याने सिरत कमिटी व केजीएन ग्रुपच्यावतीने मंगळवार, 19 ऑक्टोबर रोजी सकाळी ईद-ए-मिलाद निमित्त जुलुस काढण्यात आला. केजीएन ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष जहीर कादरी यांच्या नेतृत्वाखाली हजरत शहेनशाह वली दर्गा येथुन जुलूस प्रारंभ झाला.
हा जुलूस शहरातील कंकालेश्वर मंदीर परीसर, चांदणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, कारंजा, बुंदेलपुरा, राजूरीवेस, बशीरगंज, जुने एसपी ऑफिस, गुलजारपुरा, अजीजपुरा, कागदीवेस मार्ग आदि मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करीत जुनाबाजार येथील खादरपाशा मस्जीद येथे पोहचला व तेथे दरूद व फातेहा पठण करून जुलुस चा समापन करण्यात आला.
या जुलूस मध्ये शिवसेना युवा नेते योगेश क्षीरसागर, शिवसंग्राम चे नेते रामहरी मेटे, जेष्ठ नेते खालेख पेंटर साहेब, जेष्ठ नेते सिकंदर खान पठाण, एमआईएम चे जिल्हाध्यक्ष शफीक भाऊ, काँग्रेसचे शहर अध्यक्ष इद्रीस हाश्मी, द्वारकाधीश चे संस्थापक अध्यक्ष परशुराम भैय्या गुरखुदे, यशराज पंडीत, नगरसेवक शुभम धूत, प्रा. जावेद खान, शाहेद पटेल, शिवसंग्राम चे सुहास पाटील, अखिल भाई, शकील खान, मिर्झा अजमतूल्लाह बेग, मो.उबेद खालेख पेंटर, डॉ.मोईन शेख, अनवर खान, समीर तांबोळी, शेख इर्शाद भाई बिल्डर, आवेस शेख, ॲड. रईस पठाण, मुशीर कादरी आदिंनी उपस्थित राहून सर्वांना ईद-ए-मिलाद निमित्त शुभेच्छा दिल्या. दरम्यान या जुलूस से ठिकठिकाणी स्वागत करीत हिदु-मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून एकात्मतेचा परिचय दिला. यावेळी जुलूस से आयोजक तथा केजीएन ग्रुप चे प्रदेशाध्यक्ष जहीर कादरी यांनी व कमिटीच्या पदाधिकाºयांनी सर्वांचे आभार मानले.
लंगर-ए-आम व मुए-ए-मुबारक चे दर्शन
दरम्यान ईद-ए-मिलादनिमित्त सर्व धार्मिक कार्यक्र म शांततेत व निवडक लोकांच्या उपस्थितीत पार पडले. केजीएन मस्जीद शहेंशाहनगर परीसरात लंगर-ए-आम (महाप्रसाद) चे वितरण करण्यात आले. दुपारी दोन ते सायं पांच वाजेपर्यंत मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या मुए-ए-मुबारक चे दर्शन हा कार्यक्रम पार पडला. या दोन्ही कार्यक्रमाचा असंख्य बांधवांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झोहेब कादरी, शोएब कादरी, इम्रान खान, हुमेर खान,कलीम राज, झुबेर खान, अरबाज खान आदींनी प्रयत्न केले.

इस्लाम धर्म शांतता व प्रेमाचा संदेश देतो
विश्वगुरू व मानवजातीचे मार्गदर्शक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिवस संपुर्ण मानवजातीसाठी शांतता व प्रेमाचा संदेश देतो. इस्लाम धर्म शांतीचा संदेश देणारा धर्म आहे. आजचा जुलूस हिंदू-मुस्लिम एकता वृध्दींगत करणारा ठरला. कोविड-19 चे नियमाचे पालन करीत निवडक लोकांच्या उपस्थितीत जुलूस शांततेत पार पडला.
– जहीरअली कादरी,
प्रदेशाध्यक्ष, केजीएन ग्रुप