प्रियांका गांधींच्या अटकेचा जिल्हा काँग्रेसच्या वतीने तिव्र निषेध, जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन
बीड (प्रतिनिधी) : लखिमपूर येथील शेतकर्यांचे आंदोलना चिरडण्यासाठी आंदोलन करणार्या शेतकर्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांची हत्या करण्यात आली. त्या शेतकर्यांच्या भेटीस लखिमपूर येथे जात असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली अटक करून स्थानबद्ध केले. ही भाजपाची हुकूमशाही असून ती सहन केली जाणार नाही.

आता काँग्रेस भाजपाला आणि योगी सरकारला जशास तसे उत्तर देईल अशा तिव्र शब्दात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी घटनेचा निषेध केला. जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. शेतकरी आंदोलना दरम्यान आंदोलन करणार्या शेतकर्यांचा अपघात घडवून त्यांची हत्या करण्यात आली. त्या शेतकर्यांच्या भेटीस लखिमपूर खीरी येथे जात असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली अटक करून स्थानबद्ध केले.
या घटनेचा बीड जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेश पोलिसांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार काम करत असल्याने आता भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे भाजपा हुकूमशाही गाजविण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र या पुढे भाजपाला काँग्रेस जशास तशे उत्तर देईल. केंद्रीय कृषी कायद्याच्या विरुद्ध आंदोलन करणार्या शेतकर्यांच्या आंदोलनात वाहन घुसवून चार शेताकर्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण देशात उत्तर प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकार च्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
जिल्हाधिकारी यांना निवेदन
सदर घटनेत मृत्यमुखी पडलेल्या शेतकर्यांच्या परिवाराच्या सांत्वनासाठी लखिमपूर खीरी येथे जात असलेल्या भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली अटक करून स्थानबद्ध करण्याच्या भ्याड कृतीचा निषेध म्हणून बीड जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. यावेळी युवा नेते आादित्य पाटील, पशुपतीनाथ दांगट, प्रदेश सचिव फरीद देशमुख, नवनाथ बापू थोटे, संतोष निकाळजे, प्रताप मोरे, अर्जुन दळे, जालिंदर कराडकर, शेख सिराज, कपिल मस्के, एंड नितीन वाघमारे, परवेज कुरेशी, गणेश बजगुडे जयप्रकाश आघाव, ऐंड गणेश करांडे, संभाजी जाधव, विष्णू मस्के, अशोक जोगदंड, डॉ. शेरखान, वाघमारे आदि उपस्थित होते.