– झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष गौतम खटोड यांची माहिती
By MahaTimes Online | Beed –
नववर्षाचे स्वागत अध्यात्मिक विचारांनी करण्यासाठी तसेच तरुणांमध्ये विचारांचे गांभीर्य निर्माण व्हावे या उद्दात्त हेतूने गत 18 वर्षांपासून बीडमध्ये स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाचा 19 वा महोत्सव शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडणार आहे. अशी माहिती झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष गौतम खटोड यांनी रविवारी दिली.

स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाने गत अठरा वर्षांपासून बीडमध्ये अध्यात्मिक विचारांची ज्ञानगंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहचवली आहे. महोत्सवाच्या माध्यमातून राज्य आणि देशभरातील अनेक ज्ञानी, विद्वान मान्यवर कीर्तनकार, भागवतकार, संत-महंतांचे अमूल्य विचार बीडकर रसिक-श्रोत्यांना श्रवण करता आले. प्रतिष्ठानच्या वतीने सामुहिक विवाह सोहळे, कन्यारत्नांचा सामुहिक नामकरण सोहळा, मोफत मोतीबिंदू नेत्रशस्त्रक्रिया, संगीतमय श्रीमद् भागवत कथा, संगीतमय श्रीरामकथा, संगीतमय श्री बालाजी चरित्र कथा, तसेच इतर धार्मिक, अध्यात्मिक विचार रसिक श्रोत्यांपर्यंत पोहचवले. याबरोबरच भाव-भक्ती गीतांसह, भरतनाट्यम असे उपक्रम घेवून स्थानिक कलावंतांनाही व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या या महोत्सवात या सर्व उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, पोस्टर स्पधेचे आयोजन करुन मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यातही आले.
इतर बातम्या: सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एस.टी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचाी गोडी निर्माण होवून कॉपीमुक्त शिक्षणासाठी कीर्तन महोत्सवाच्या दरम्यान जि.प.शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासनासोबत संयुक्त कॉपीमुक्ती रॅलीचे आयोजनही करत प्रबोधनाची चळवळ निर्माण केली गेली आहे. अध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, उपक्रम राबवतानाचा शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे व्याख्यान आयोजीत करुन जनसामान्यांपर्यंत शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड व सचिव सुशील खटोड यांनी सातत्याने कार्य करत आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण श्रमातून हा कीर्तन महोत्सव बीडकरांसह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात पोहचला आहे. यंदाही 19 व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात आले आहे.
20 डिसेंबरपासून आनंदऋषिजी नेत्रालयात मोफत नेत्र तपासणी
या कीर्तन महोत्सवानिमित्त बीड येथील आनंदऋषिजी नेत्रालय, व्हिजन सेंटर,जालना रोड बीड येथे दि. 20 डिसेंबर 2021 ते 10 जानेवारी 2022 या कालावधीत दररोज सकाळी 9 ते सायं.5 यावेळेत मोफत नेत्र तपासणी व अत्यल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहेत. तसेच अत्यल्प दरात ब्रॅन्डेड चष्मे उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे डोळ्यांच्या गंभीर आजारावरील उपचारासाठी जनआरोग्य योजना लागू आहे. बीड येथील आनंदऋषिजी नेत्रालय, व्हिजन सेंटरमध्ये गत 15 महिन्यात 3 हजार 500 रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्या असल्याची माहिती प्रतिष्ठानने दिली. बीड शहर व जिल्ह्यातील विविध भागातील गरजू रुग्णांनी या शिबीरात येवून आपली नेत्र तपासणी करुन घ्यावी असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, सचिव सुशील खटोड यांच्यासह निर्मला खटोड, शुभम खटोड, आशिष खटोड व इतर पदाधिकार्यांनी केले आहे.